शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे.
भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता.हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे.
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे.
किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा
साखळीची वाट
दुसरी
वाट म्हणजे साखळीची वाट हि वाट लवकर किल्य्यावर घेऊन जाते. या वाटेवरून
जाताना शिवनेरीच्या पोटातल्या सातवाहन कालीन लेण्याच दर्शन घेता येत.
शिवनेरी किल्यावर शिवाईदेवी च मंदिर आहे. या देवीच्या नावावरून जिजाबाई ने
आपल्या पुत्राच नाव शिवाजी ठेवल.
शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील
जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच
शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांच हे
जन्मस्थान आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास
महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे.या किल्ल्याला चारही
बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर
शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
येथे 64 लेण्या आणि आठ शिलालेख सापडले आहेत. शिवनेरी किल्ल्यावर शिलाहार,
सातवाहन, बहामनी, यादव आणि नंतर मुघल साम्राज्य अशा अनेक राज्यकर्त्यांनी
राज्य केले. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले आणि 1599 मध्ये छत्रपती
शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजा यांना किल्ला बांधण्यात आला.
शिवनेरीचे ऐतिहासिक महत्त्व
गडावरची सर्वांत महत्त्वाची वास्तू म्हणजे
शिवजन्मस्थान.
१९ फेब्रुवारी १६३० म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या
दिवशी येथे शिवरायांचा जन्म झाला.
या ठिकाणी आल्यावर प्रत्येक भारतीय
नतमस्तकच होतो.
शिवनेरीच्या
परिसरात हडसर, चावंड, जीवधन, हरिश्चंद्रगड असे किल्ले व लेण्याद्री, ओझर
अशी तीर्थस्थाने आहेत.
आधुनिक काळात सरकारने शिवकुंज हे स्मारक उभारले आहे.
त्यामध्ये जिजाऊसाहेब आणि बाल शिवाजी यांचा सुंदर पुतळा उभारला आहे.
शिवनेरी मधील आकर्षणे
जन्म-घर: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या घरी झाला त्या घराचे अलीकडे पुनर्स्थापित केले गेले आहे.
पुतळे: किल्ल्याच्या दक्षिण टोकाला जिजाबाई व छोट्या शिवाजीचे पुतळे आहेत.
शिवाई मंदिर: छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे ठेवले गेले.
बदामी तलाव: गडाच्या उत्तर दिशेला बदामी तलाव नावाचा तलाव आहे.
प्राचीन लेणी: गडाजवळ काही भूमिगत बौद्ध लेण्याही आहेत.
पाण्याचे साठे: किल्ल्यात अनेक खडक-पाण्याच्या टाक्या आहेत. गंगा आणि यमुनेमध्ये पाण्याच्या मोठ्या टाक्या आहेत.