1➤ अमेरिकेचा प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कार 64th (2022) ____________ यांना मिळाला.
ⓐ रिकी केज ⓑ फाल्गुनी शाह ⓒ रिकी केज , फाल्गुनी शाह ⓓ जतीन ललित
➤ रिकी केज , फाल्गुनी शाह
Grammy Awards 2022: ‘ग्रॅमी’ हा संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. लास वेगासमधील एमजीएम ग्रँड मार्की बॉलरुमध्ये नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी भारतीय वंशाच्या दोन कलाकारांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. संगीतकार रिकी केज आणि भारतीय अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह (Falguni Shah) यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. रिकी केज (Ricky Kej) यांचा हा दुसरा ग्रॅमी पुरस्कार आहे.
64व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांना ‘बेस्ट न्यू एज अल्बम’ या विभागात पुरस्कार मिळाला आहे.
2➤ महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे ?
ⓐ संत नामदेव महाराज ⓑ संत तुकाराम महाराज ⓒ संत तुकडोजी महाराज ⓓ संत गाडगे महाराज
➤ संत गाडगे महाराज
3➤ केंब्रीज विद्यापिठाने भारताच्या कोणत्या पंतप्रधानाच्या नावाने शिष्यवृत्ती जाहीर केली ?
ⓐ इंदिरा गांधी ⓑ मनमोहन सिंग ⓒ जवाहरलाल नेहरु ⓓ . पी. व्ही. नरसिंहराव
➤ मनमोहन सिंग
4➤ टिंग्याची भूमिका केलेल्या कलाकाराचे आडनाव काय आहे ?
गांधी शांतता पुरस्कारा साठीच्या निवड समितीचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्याचबरोबर दोन माजी वरिष्ठ पदाधिकारी, यात सरन्यायाधीश आणि लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि सुलभ आंतरराष्ट्रीय समाजसेवा संस्थेचे संस्थापक बिंदेश्वर पाठक हे दोन प्रमुख मान्यवर सदस्य या मंडळाचे सदस्य आहेत.
निवड समिती सदस्यांची 19 मार्च 2021 रोजी बैठक झाली आणि विचारविनिमयानंतर एकमताने बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. गांधींजींनी दाखवलेल्या अहिंसा आणि इतर मार्ग, पद्धतींच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी बंगबंधु शेख मुजीबुर रहमान यांना सन 2020 साठी गांधी शांती पुरस्कार जाहीर झाला आहे.
रुपये एक कोटी, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि उत्कृष्ट पारंपारिक हस्तकला भेट हे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की वंगबंधु मानवाधिकार आणि स्वातंत्र्याचे विजेते होते आणि भारतीयांचे देखील ते नायक होते.
9➤ 8 मार्च __________ म्हणून पाळला जातो.
ⓐ आंतरराष्ट्रीय महिला दिन ⓑ जागतिक एडस् दिन ⓒ जागतिक कामगार दिन ⓓ मानवी हक्क दिन
➤ आंतरराष्ट्रीय महिला दिन
10➤ पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्चन्यायालयाचे खंडपीठ नाही ?
ⓐ नागपूर ⓑ पणजी ⓒ औरंगाबाद ⓓ नवी मुंबई
➤ नवी मुंबई
11➤ 'शांतता ! कोर्ट चालू आहे' हे नाटक कोणी लिहिले ?
ⓐ वसंत बापट ⓑ संतोष पवार ⓒ विजय तेंडूलकर ⓓ वसंत कानेटकर
➤ विजय तेंडूलकर
12➤ उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती __________ या पंचवार्षिक योजनेत झाली.
ⓐ आठव्या ⓑ नवव्या ⓒ सातव्या ⓓ वरीलपैकी नाही
➤ नवव्या
या नवव्या पंचवार्षिक योजनेचे खालीलप्रमाणे उद्दिष्टे होती.
कृषी व ग्रामीण विकास ह्यांना अग्रक्रम देणे.
कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे.
सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरविणे .
शाश्वत विकास
स्त्रिया, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय लोकांचे सबलीकरण करणे.
लोकांचा सहभाग वाढू शकणाऱ्या संस्थांच्या विकासास चालना देणे.
या योजनेचा कालावधी १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२ पर्यंत होता. तत्कालीन UF सरकारने या नवव्या योजनेचा मसुदा मार्च १९९८ मध्ये जाहीर केला.फेब्रुवारी १९९९ मध्ये NDA सरकारने तयार केलेला मसुदा ' राष्ट्रीय विकास परिषदेने ' संमत केला . ही योजना १५ वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती.
13➤ हिराकूड योजना निर्मिती ही ___________ पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.
ⓐ पहिल्या ⓑ दुस-या ⓒ चौथ्या ⓓ तिस-या
➤ पहिल्या
पहिली पंचवार्षिक योजना (१९५१ ते १९५६)
पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. पहिली पंचवार्षिक योजना १९५१ मध्ये सुरू करण्यात आली होती जी मुख्यत: प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करते.
पहिल्या पंचवार्षिक योजनेला डोमर-महालानोबिस मॉडेल असेही म्हणतात.
हे हॅरॉड-डोमर मॉडेलची काही बदलांसह सुधारित आवृत्ती होती. या आराखड्यात कृषी, सिंचन आणि ऊर्जा प्रकल्पांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
14➤ _________ हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली.
ⓐ श्री. सी. डी. देशमुख ⓑ श्री. जवाहरलाल नेहरु ⓒ श्री. के. सी. पंत ⓓ श्री. राजेंद्र प्रसाद
➤ श्री. जवाहरलाल नेहरु
नियोजन आयोग ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती.
नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली.
नियोजनाची संकल्पना जोसेफ स्टॅलिनने सादर केलेल्या रशियन मॉडेलवर आधारित होती.
पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात.
जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते.
गुलझारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते.
नरेंद्र मोदी सरकारने 2014 मध्ये नियोजन आयोग बरखास्त केला.
नियोजन आयोगाची जागा 2014 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या नीति आयोगाने घेतली.
15➤ ताशी 45 कि.मी. वेगाने जाणा-या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस, 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल ?
ⓐ 64 sec. ⓑ 85 sec ⓒ 36 sec ⓓ 70 sec.
➤ 64 sec.
दोन लांबी असल्याने त्यांची बेरीज
400+400= 800
वेग = अंतर /काळ
note- यामध्ये वेग km/hr मध्ये आहे त्याचे रुपांतर m/s मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणाने.
45*5/18=12.5
वेळ = 800/12.5= 64 sec
16➤ अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी ___________ मध्ये आढळतात.
ⓐ अमिबा ⓑ लाल पेशी ⓒ जीवाणु ⓓ जलव्याल
➤ जीवाणु
17➤ मद्यपानामुळे _____________ चा अभाव निर्माण होतो.
ⓐ नायसिन ⓑ थायमिन ⓒ रेटिनॉल ⓓ अॅस्कॉर्बिक आम्ल
➤ नायसिन
18➤ मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण __________ हे विकर त्याच्या जठरात नसते.
ⓐ सेल्युलीन ⓑ सेल्युलेज ⓒ सेल्युपेज ⓓ पेप्सीन
➤ सेल्युलेज
19➤ खालीलपैकी कोणती वनस्पती, टेरिडोफायटा या संवहीनी वनस्पती वर्गात येत नाही ?
ⓐ इक्विसेटिनी ⓑ मुसी ⓒ फिलीसीनी ⓓ लायकोपोडियम
➤ मुसी
20➤ जीवाणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती _____________ आहे.
ⓐ ऑरेलिया ⓑ पुनर्जीवन ⓒ मुकुलायन ⓓ विविखंडन
➤ विविखंडन
21➤ जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण ____________ आहे .
ⓐ 0.3% ⓑ 0.03% ⓒ 0. 3% ⓓ 0.003
➤ 0.03%
22➤ भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला ?
ⓐ फ्रेंच क्रांती ⓑ रशियन क्रांती ⓒ अमेरिकन क्रांती ⓓ औद्योगिक क्रांती
➤ रशियन क्रांती
८ मार्च, १९१७ – १६ जून, १९२३
23➤ 'वहाबी' चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?
ⓐ जगातील सर्व मुसलमानाचे एकत्रीकरण करणे ⓑ हिंदूना विरोध करणे ⓒ मुसलमानामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे ⓓ मुसलमानांचे राज्य स्थापन करणे
➤ मुसलमानांचे राज्य स्थापन करणे
24➤ 1919 च्या 'माँट-फोर्ड कायद्यावर' हे ‘स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली ?
ⓐ लोकमान्य टिळक ⓑ महात्मा गांधी ⓒ लाला लजपतराय ⓓ पंडित नेहरु
➤ लोकमान्य टिळक
25➤ कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतक-यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे ?