Ads Area

सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली

२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 

'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.

सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व व्यासपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली  जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला.

 सत्यशोधक समाजाचे १९११ ते २००८ अखेरच्या अध्यक्षांची मालिका मोठी असून त्यात एकापेक्षा एक श्रेष्ठ तळमळीच्या समाजकार्यकर्त्यांची मांदियाळी मोठी आहे. सत्यशोधक समाजाची  अध्यक्ष म्हणून धुरा विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांनी दि. १७ एप्रिल १९११ ते ३१ मार्च १९१२ पर्यंत सांभाळली आणि एकविसाव्या शतकात ही धुरा अ‍ॅड. वसंतराव फाळके (१५ एप्रिल २००१ ते आजतागायत -२००८) समर्थपणे सांभाळीत आहेत. तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ हे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेटाने नेत आहेत.

सत्यशोधक समाजाचे विचार

  • 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
  • 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.
  • सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे.
  • या वृत्तपत्राचे संपादक 'कृष्णराव भालेराव हे होते,
  • त्यांनी इ.स 1 जानेवारी 1877 मध्ये पुणे येथे स्थापन केले होते, या वृत्तपत्र मराठी भाषेत होते 
  • सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
  • सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे 
  • समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते
  • सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
  • सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते.इ.स 1890 मध्ये यांनी दिनबंधु या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबई येथून केले

सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, तेव्हा तीन मुख्य तत्त्व ठरवण्यात आली.

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area