Ads Area

आचार्य विनोबा भावे यांचा थोर इतिहास

आचार्य विनोबा भावे यांचा थोर इतिहास 

    आचार्य विनोबा भावे    (Wikipedia)

आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 

आचार्य विनोबा भावे यांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ साली कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तहसिलातील गागोदे या गावी एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव विनायक नरहरी भावे. त्यांच्या वडिलांचे नाव नरहरी शंभूराव आणि आईचे नाव रूक्मिणी देवी असे होते. आचार्य विनोबा भावे यांचा बहुतांश काळ धार्मिक कार्यात आणि अध्यात्मात गेला. 

आचार्य विनोबा भावे यांचा स्वातंत्र्य लढा

विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे नावाने ओळखतात) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

स्वातंत्र्य पुर्व काळातील सविनय सत्याग्रहाच्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणुन महात्मा गांधींनी आचार्य विनोबा भावेंची निवड केली होती. विनोबांचा आधुनिक राजकीय विचारांचा चांगला अभ्यास होता, भारतिय संस्कृती आणि जीवन जगण्याच्या पध्दतीचे त्यांना विशेष आकर्षण होते. या आवडीमुळेचे विनोबांनी धुळयातील कारागृहात कैदयांना भगवत्गितेवर प्रवचन दिले होते. महात्मा गांधींप्रमाणेच विनोबांना देखील प्राचीन भारतात अस्तित्वात असलेल्या आश्रमातील जीवनात विशेष आस्था होती.

सेवाग्राम आश्रमाची स्थापना ( १९४०) महात्मा गांधींनी केली होती.  महात्मा गांधींनी वर्धा येथे ज्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली होती त्यात सुरूवातीच्या काळात विनोबा भावे वास्तव्याला होते. पुढे वर्ध्यालाच विनोबांनी पवनार येथे आश्रम स्थापीत केला आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले. विनोबा भावेंचा “सब भूमी गोपाल की हा नारा त्या काळी भारतात सर्वदुर पोहोचला आणि गर्जला देखील. ते स्वतःला विश्वनागरिक समजत असत आणि म्हणुन आपल्या प्रत्येक लिखाणात किंवा संदेशात ते अखेरीस ‘जय जगत्’ असे आठवणीने लिहीत असत.

सामाजिक व धार्मिक कार्य

हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द या सोबतच सर्वधर्मातील लोकांना त्यांनी प्रेम, बंधुभाव आणि शांततेची शिकवण दिली.या दृष्टीकोनातुनच विनोबांनी हिंदु धर्माव्यतिरीक्त मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मग्रंथाचे देखील अध्ययन केले. लोकांमधली जातीधर्माची दरी दुर करून शांती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणा. या विश्वधर्माची स्थापना व्हावयास हवी म्हणुन विनोबांनी सर्वोदय योजना तयार केली होती. सन १९२३ मध्ये त्यांनी मराठीत ‘महाराष्ट्र धर्म’ हे मासिक काढले, त्यात त्यांचे उपनिषदांवरचे निबंध प्रकाशित झाले. साध्या जीवनपद्धतीला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक आश्रम स्थापन केले, जे विलासी नसलेले होते, कारण ते लोकांचे लक्ष देवाच्या भक्तीपासून वळवते. महात्मा गांधींच्या शिकवणीच्या धर्तीवर स्वावलंबन करण्याच्या उद्देशाने त्यांनी १९५९ साली महिलांसाठी ‘ब्रह्म विद्या मंदिरस्थापन केले. 

१९२० आणि १९३०  च्या दशकात भावे यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला आणि ४० च्या दशकात ब्रिटीश राजवटीविरुद्ध अहिंसक प्रतिकार केल्याबद्दल त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांना आचार्य (शिक्षक) ही सन्माननीय पदवी देण्यात आली. १९४० मध्ये, गांधीजींनी त्यांना भारतातील ब्रिटीश राजवटीविरुद्ध पहिला वैयक्तिक सत्याग्रही (सामूहिक कृतीऐवजी सत्याच्या बाजूने उभा राहणारी व्यक्ती) म्हणून निवडले.

धुळे येथील कारागृहात विनोबांनी भगवत्गीतेवर जे प्रवचन केले त्याचे शब्दांकन सानेगुरूजींनी केले. ‘गिताप्रवचने’ नावाने ते प्रसिध्द आहेत.‘गीताई’ ही विनोबा भावेंची साहित्यकृती फार लोकप्रीय आहे. १९८२ साली विनोबा भावेंनी स्वेच्छा मरण स्विकारले.

भारत सरकारनं १९८३ ला आचार्य विनोबा भावेंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९५८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे विनोबा भाबे हे पहिले आंतरराष्ट्रीय आणि भारतीय व्यक्ती होते.

आचार्य विनोबा भावे यांची पुस्तके

अष्टादशी (सार्थ)
ईशावास्यवृत्ति
उपनिषदांचा अभ्यास
गीताई
गीताई-चिंतनिका
गीता प्रवचने
गुरूबोध सार (सार्थ)
जीवनदृष्टी
भागवत धर्म-सार
मधुकर
मनुशासनम्‌ (निवडक मनुस्मृती - मराठी)
लोकनीती
विचार पोथी
साम्यसूत्र वृत्ति
साम्यसूत्रे

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area