Ads Area

श्रीमती इंदिरा गांधी

 

श्रीमती इंदिरा गांधी

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

  • इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (१९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४)
  • या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या.
  • १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या.
  • इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

  • बांगलादेश स्वातंत्र्य सन्मान हा बांगलादेशातील गैर-राष्ट्रीयांसाठीचा सर्वोच्च नागरी सन्मान इंदिरा गांधी यांना मरणोत्तर बहाल करण्यात आला.
  • भारताच्या सर्वात दक्षिणेकडील ठिकाणाला इंदिरा पॉइंट हे त्यांच्या नावावर आहे.
  • इंदिरा आवास योजना हा ग्रामीण भागातील गरिबांसाठी केंद्र सरकारचा कमी किमतीचा गृहनिर्माण कार्यक्रम त्यांच्या नावावर आहे.
  • इंदिराजींच्या सन्मानार्थ नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले आहे.
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ त्यांच्या नावावर आहे.
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९८५ मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी वार्षिक इंदिरा गांधी पुरस्कार स्थापित केला,
  • जो इंदिराजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ दिला जातो.
  • इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने वार्षिक इंदिरा गांधी पुरस्कार स्थापन केला.

श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म


पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले होते.

श्रीमती इंदिरा गांधी

बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता 1930 मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ देखील उभी केली होती. सप्टेंबर 1942 साली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. 1947 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले.

26 मार्च 1942 रोजी श्रीमती इंदिरा गांधींनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. 1955 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी कॉंग्रेस कार्यकारी समिती व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या. 1958 मध्ये त्यांना कॉंग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या ‘एआयसीसी’च्या राष्ट्रीय एकता परिषदेच्या अध्यक्ष व 1956 मध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेस तसेच ‘एआयसीसी’ महिला विभागाच्या अध्यक्ष बनल्या. 1959 ते 1960 या वर्षात त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अध्यक्ष होत्या. जानेवारी 1978 मध्ये त्यांनी पुन्हा हे पद स्वीकारले.  

1964 ते 1966 दरम्यान त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या. त्यानंतर जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत त्या पंतप्रधान होत्या. त्याबरोबरच त्यांना सप्टेंबर 1967 पासून मार्च 1977 पर्यंत अणु उर्जा मंत्री होत्या. त्यांनी 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त भार सांभाळला. 14 जानेवारी 1980 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. 

ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1967 पर्यंत श्रीमती इंदिरा गांधीं राज्यसभेच्या सदस्य होत्या. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सत्रात त्या लोकसभा सदस्य होत्या. जानेवारी 1980 मध्ये त्या रायबरेली (उत्तरप्रदेश) व मेडक (आंध्रप्रदेश) येथून सातव्या लोकसभेवर निवडून गेल्या. रायबरेलीची जागा सोडून त्यांनी मेडकच्या जागेची निवड केली. त्यांना 1967-77 मध्ये आणि पुन्हा जानेवारी 1980 मध्ये कॉंग्रेस संसदीय मंडळ नेता म्हणून निवडले गेले.

इंदिरा गांधी यांचे चरित्रलेखक

  • इंदर मल्होत्रा
  • उषा भगत (इंदिराजी थ्रू माय आईज)
  • कॅथेरीन फ्रॅंक (मराठी अनुवाद - लीना सोहोनी)
  • डॉम मोराईस (मिसेस गांधी)
  • पी.सी. ॲलेक्झॅण्डर (My years with Indira Gandhi; इंदिरा गांधी अंतिम पर्व)
  • पुपुल जयकर (Indira Gandhi - Biography, मराठी अनुवाद अशोक जैन)
  • प्रणय गुप्ते (मूळ इंग्रजीत, मदर इंडिया. मराठी अनुवाद : पंढरीनाथ सावंत, रमेश दिघे)
  • सागरिका घोष (इंग्रजीत, India's Most Powerful Prime Minister)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद :

१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

माहिती व नभोवाणी मंत्री : जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.

पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांतिसमझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

          पोलीस भरती Test-15

          पोलीस भरती Test-16

Tags

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area