Ads Area

भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल

भारतीय स्वातंत्र्य सेनानी सरदार वल्लभ भाई पटेल

  • वल्लभभाई पटेल हे भारतातील एक राजकीय व सामाजिक नेते होते. 
  • त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली. 
  • वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते.
  • वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले.
  • वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले.

जन्म

भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक सरदार वल्लभ भाई पटेल यांना सर्वजण भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखतात. त्यांचा जन्म जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण खूप उशिरा सुरू झाले. तरुण होईपर्यंत ते आपल्या घरीच वडिलांना शेती कामात मदत करत असत. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई तर आईचे नाव लाडबा असे होते


सरदार पदवी बहाल 

वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली.

सुरूवातीपासूनच त्यांना देशसेवेची आवड होती. त्यामुळेच राजकीय कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रीय होते. सरदार पटेल पंतप्रधान व्हावेत अशी काँग्रेसमधील प्रत्येकाच नेता आणि कार्यकर्त्याची इच्छा होती, पण गुरूस्थानी मानलेल्या महात्मा गांधींजींच्या सांगण्यावरून सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली.

सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलन 

वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करीत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा,आणंद जिल्ह्यातील बोरसद आणि सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील खेडुतांना संघटित करून त्यांनी इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्त्वाचे नेते होते. १९३४ व १९३७ च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बांधले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते.

गृहमंत्री व उपपंतप्रधान 

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खासगी मालकी हक्कांचे समर्थक होते भारताची एकता आणि अखंडता यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान खुप महत्त्वाचे आहे.

सरदार वल्लभ भाई पटेल यांचे निधन 

सरदार वल्लभ भाई पटेल हे भारताचे सक्षम नेतृत्व होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यात भारताच्या अखंडतेसाठी आणि विकासासाठी भरपूर प्रयत्न केले. अशा या महान लोहपुरुषाचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Tags

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area