निळीचा उठाव-हा उठाव ‘ब्लू म्यूटिनी’ म्हणूनही ओळखला जातो. (१८५९-६०)
- भारतातील बंगाल प्रांतातील नीळ उत्पादक शेतकर्यांनी मळेवाल्यांविरुद्ध केलेला प्रसिद्ध उठाव (१८५९-६०).
- १८५८ मध्ये दीनबंधू मित्रा यांनी नील दर्पण हे नाटक लिहून या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला.
इंग्रज अधिकाऱ्यांनी कवडीमोल किंमतीत विकत घेतलेल्या निळीच्या शेतीत राबण्यासाठी शेतमजूरांची गरज होती. या मजूरांना एकत्र करुन त्यांच्याकडून निळीची शेती करवली जावू लागली. दुसऱ्या शेतकऱ्यांकडून जबरदस्ती निळ उत्पन्न घ्यायला सुरुवात केली.
- याचा एक तोटा होता. निळीचं पिक घेतलं की ती जमिनीतली सारीच पोषण तत्व शोषूण घ्यायची त्यामुळं एक दोन पिकं घेतल्यानंतर जमिनी पडीक पडायला सुरवात झाली, सुपिक जमिनींना फटका बसला. नंतर अशी परिस्थीती निर्माण झाली की शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त कर्ज आली उत्पन्न इंग्रजांच्या वाट्याला. शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या बोज्याखाली दबत होती. अत्याचारान परिसीमा गाठली आता वेळ आली होती उठावाची.
- वर्ष १८५९ बंगालच्या हजारो शेतकऱ्यांनी शेती करायला नकार दिला. या आधी स्प्टेंबर १८५८ला बंगालच्या गोविंदपूर जिल्ह्यात विद्रोहाची ठिणगी पडली. उठावाच नेतृत्तव दिगंबर विष्णू आणि विष्णू विश्वास यांनी केलं. त्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निळीची शेती करायला नकार दिला. १८६० पर्यंत या ठिणगीची आग बनली. बंगाल,मालद,ढाका, पावनाला या आगीनं कवेत घेतलं. बंगालमध्ये मोठा भूकंप आला. शेतकऱ्यांनी एकजुटीनं विद्रोहाला बळ मिळालं. शेतकऱ्यांनी कर द्यायलाही नकार दिला. पुरषासह महिलांनीदेखील उडी घेतलीा. शेतमजूरांनीसुद्धा या उठावाला पाठिंबा देवून कामं थांबवली. जमिनदारांनी शेतकऱ्यांच्या उठावाला समर्थन दिलं. उठाव अधिक तीव्र झाला.
निळीचा हा विद्रोह सुरुच राहिला. त्यांना विश्वास होता की ब्रिटीश सरकार शेतकऱ्यांना समोर झुकेल. कारण १८५७चा उठाव होवून फक्त एक वर्ष झालं होतं. शेतकऱ्यांच्या या उठावाचे लोन संपूर्ण भारतभर पसरेल. भारतातून पसारा आवरुन इंग्लंडला जायची वेळ येईल हे ध्यानात घेवून इंग्रजांनी माघार घेतली. इंग्रज शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळं पुरते घाबरले होते. त्यांना कोणत्याही परिस्थीतीत हा उठाव मिटवायचा होताकाही दिवसातच त्यांनूी फरमान काढलं, इंग्लंड राणी व्हिक्टोरीयानं निळीची शेती न करण्याचे आदेश दिले. उठाव दिवसेंदिवस उग्र होत गेला. पत्रकार, लेखकांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली