Ads Area

भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात? चला जाणून घेऊया....

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

लालकृष्ण अडवाणी यांना नुकताच केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. जिवंतपणी किंवा मरानोत्तर हा पुरस्कार दिला जातो. लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर अनेकांच्या मनात कुतूहल असेलच की देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीला कोणत्या सुविधा मिळतात. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

  • भारतरत्न प्राप्त करणार्‍या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष व्हीआयपी दर्जा दिला जातो.
  • आयकर न भरल्यास सूट देखील उपलब्ध आहे.
  • भारतरत्न प्राप्त व्यक्ती संसदेच्या बैठका आणि अधिवेशनांना उपस्थित राहू शकतात.
  • देशाचे राष्ट्रीय सण स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात.
  • भारतरत्न प्राप्तकर्ते विमान, ट्रेन आणि बसने मोफत प्रवास करू शकतात.
  • राज्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांना राज्य पाहुण्याचा दर्जा मिळतो.
  • या पुरस्काराने सन्मानित झालेल्या व्यक्तीला सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसीमध्ये स्थान देते, ज्याचा उपयोग सरकारी कार्यक्रमांमध्ये प्राधान्य देण्यासाठी केला जातो.
  • भारतरत्न मिळवणाऱ्या लोकांना राज्य सरकार सुविधा पुरवतात.


भारतरत्नचे पहिले मानकरी
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण हे या पुरस्काराचे पहिले मानकरी होते. त्यांनातत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 1954 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 1954 पर्यंत केवळ हयात असलेल्या व्यक्तींना उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान केला जात होता. मात्र 1955 मध्ये त्यामध्ये बदल करून मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची तरतूद करण्यात आली. दरवर्षी 26 जानेवारीला हा पुरस्कार प्रदान केला जातो. 
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. आडवाणी यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
  •  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. आडवाणी यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. 
  • लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये नमूद केले

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area