Ads Area

गोदावरी नदी

गोदावरी नदी उगम

 

पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

Maharashtra Police Bharti 2022- Test

Police Bharti Test By Mystudynotes.in

जी अव्यय बोलणाऱ्याच्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, अनुमोदन इत्यादी भाव किंवा वृत्ती दर्शवितात. त्यांना केवलप्रयोगी अव्यये असे म्हणतातगोदावरी नदी उगम
  • गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. 
  • या नदीला दक्षिण गंगा असे ही म्हटले जाते.
  • गोदावरी नदीची लांबी १, ४५० किलोमीटर आहे.
  • गोदावरीचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो.
  • आणि पुढे आग्नेय दिशेला वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात मिळते.

पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायश्चित म्हणून भगवान शंकराची तपस्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली. गौतम ऋषींनी गोदावरीत स्नान करून गोहत्येचे पाप धुतले.

गोदावरी नदीचे धार्मिक महत्व

गोदावरी नदीला गंगा असेही म्हणतात. भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याचा अगोदर गोदावरीचा उगम झाला होता. त्यामूळे तिला दक्षिण गंगा नावानेही ओळखले जाते. येथेच १२ शिवजोतीर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक जोतिर्लिंग आहे. त्र्यंबकेश्वर पासून पुढे वाहतांना गोदावरीचा प्रवाह गुप्त होतो. २०-२५ किमीचा प्रवास करून गोदावरी नाशिक शहरातून वाहते. रामायण काळात नाशिकचा उल्लेख दंडकारण्य असा आहे.  प्रभू रामचंद्रांनी १४ वर्षाच्या काळात पंचवटी येथे गोदातीरी पर्णकुटी उभारली होती. आजही गोदावरीत रामकुंड, सीताकुंड ही पवित्र कुंड आहे. नाशिक मध्ये गोदावरी प्रवाह बदलते, काटकोन वळण घेऊन पूर्वेकडे वाहते. त्यामुळे येथे चुंबकीय क्षेत्र तयार झाले आहे. मानवांच्या अस्थी येथे पाण्यात विरघळतात म्हणून देशभरातून भाविक येथे अस्थी विसर्जनासाठी येतात. अमृत – मंथनच्या वेळेस अमृताचे थेंब रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी पडले.

१२ वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा

कुंभमेळा 12 वर्षांनी का भरतो तर यामागची पुराणकथा अशी आहे की, जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा अमृत प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये युद्ध झाले होते. हे युद्ध सलग 12 दिवस चालले. या युद्धादरम्यान चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. हे थेंब पडलेले ठिकाण म्हणजे प्रयाग, ‍हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन. कालगणनेनुसार देवतांचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षासारखा असतो. त्यामुळे दर 12 वर्षांनी या चार ठिकाणी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. आणि ज्या ठिकाणी हे थेंब पडले तिथे प्रत्येक 12 वर्षात कुंभमेळा भरतो.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area