जैन धर्म
पोलिस भरती, MPSC, ZP, नगरपरिषद, सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त
- follow us on Website https://www.mystudynotes.in/
- follow us on telegram https://t.me/mystudynotes278
- follow us on news https://www.barkhanews.in/
Maharashtra Police Bharti 2022- Test
Police Bharti Test By Mystudynotes.in
जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म
असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री ऋषभदेवांनी केले.
लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म
वैदिक परंपरेनरूप व वैदिक परंपरेसारखा प्राचीन आहे. हा धर्म श्रमण परंपरा
पालन करतो. तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो.
- वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला- पावापुरी
- जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते- ऋषभदेव
- जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर कोण होते- महावीर
- जैन धर्मात एकूण किती तीर्थंकर होवून गेलेत- चोवीस तीर्थंकर
- सर्वसंग परित्याग केलेल्या व्यक्तीस जैन धर्मात काय म्हणतात- श्रमण
- अस्तेय म्हणजे काय - चोरी न करणे
- जैन धर्मात जिन कोणास म्हणतात- महावीर
पंचमहाव्रते
- अहिंसा - अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाची मन, वचन अथवा कायेद्वारे हत्या करू नये.
- अस्तेयं - अस्तेय म्हणजे चोरी करू नये.
- सत्यं - सत्य म्हणजे नेहमी खरे बोलावे.
- अपरिग्रह - अपरिग्रह म्हणजे द्रव्यसंग्रह करू नये, स्वार्थी वृत्तीचा त्याग करावा.
- ब्रह्मचर्य - मनामध्ये कामवासना बाळगू नये.
- ऋग्वेदात कोणत्या तीर्थकराचा उल्लेख आढळतो- ऋषभदेव
- महावीरांनी सांगितलेले पाचवे महाव्रत कोणते- ब्रम्हचर्य
- जैन धर्मातील दोन पंथ कोणते- दिगंबर व श्वेतांबर@@@@
- वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला- कुंदग्राम
- जैन धर्मातील तेविसावे तीर्थंकर कोण होते- पार्श्वनाथ
- त्रिरत्ने कोणत्या धर्माची प्रमुख शिकवण आहे -जैन धर्म
- जैन धर्मातील मूळतत्व कोणते- अहिंसा
- महावीराना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली-ऋतुपालिका
- महावीराना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली- शालवृक्ष
- वर्धमान महावीर कोणत्या वंशाचे होते- ज्ञातृक
- महावीरांच्या ज्ञानप्राप्तीस काय म्हणतात- कैवल्यप्राप्ती
- कोणत्या मौर्य सम्राटाने जैन धर्म स्वीकारला होता-चंद्रगुप्त मौर्य
- श्वेतांबर पंथाचा उदय कुणाच्या नेतृत्वाखाली झाला- शंभूतविजय
- कोणता जैन पंथ पार्श्वनाथास आपले गुरु मानतात- श्वेतांबर पंथ
- कोणत्या जैन पंथात स्त्रियांना स्थान नाही- दिगंबर पंथ
- जैन धर्मातील सुधारणावादी पंथ कोणता - श्वेतांबर पंथ
- जैन धर्मातील गोमटेश्वराची मूर्ती कोठे आहे - श्रवणबेळगोळा
- जैन धर्मातील साहित्यास काय म्हणतात- अंग
- जैन धर्मातील प्रमुख ग्रंथ कोणता- परिशिष्ट पर्व
- वर्धमान महाविराच्या आई-वडिलांचे नाव काय होते- त्रिशाला आणि सिद्धार्थ
- वर्धमान महाविरांनी कुणाच्या परवानगीने गृहत्याग केला- मोठा भाऊ नंदिवर्धन
- कोणता जैन पंथ महावीराना आपले गुरु मानतात -दिगंबर पंथ
- दिगंबर पंथाचा उदय कुणाच्या नेतृत्वाखाली झाला- भद्रबाहू
- श्री वृषभनाथ भगवान - वृषभदेव भगवान या युगातील प्रथम तीर्थंकर आहे. वृषभदेव यांना आदिनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते. आदिनाथांचा जन्म अयोध्येत झाला. व त्यांनी अयोध्येवर राज्य केलं. त्यांचे पिता नाभी हे होते तर आईचे नाव मरुदेवी हे होते. वृषभनाथ हे इक्ष्वाकूवंशातील होते. त्यांच्या पुत्रापैकी चक्रवर्ती सम्राट भरत व भगवान बाहुबली हे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या राज्यातील जनतेला जीवन कौशल्य, नैतिक मूल्ये, संस्कार शिकवले काही काळ राज्य केल्यानंतर त्यांनी त्यांच राज्य मुलात वाटुन दिल्यानंतर आदिनाथांनी दिक्षा घेतली. व तपश्चर्या करू लागले काही काळानंतर केवल ज्ञान प्राप्त झाले व ते अरिहंत झाले. त्यांनी धर्माचे उपदेश दिले शेवटी कैलास पर्वतावर जाऊन ध्यानधारणा केली व तेथून निर्वाण प्राप्त केलं व मोक्षपद मिळवलं.
- श्री अजितनाथ भगवान
- श्री संभवनाथ भगवान
- श्री अभिनंद भगवान
- श्री सुमतिनाथ भगवान
- श्री पद्मप्रभ भगवान
- श्री सुपार्श्वनाथ भगवान
- श्री चंद्रप्रभ भगवान
- श्री पुष्पदंत भगवान
- श्री शीतलनाथ भगवान
- श्री श्रेयांसनाथ भगवान
- श्री वासुपूज्य भगवान
- श्री विमलनाथ भगवान
- श्री अनंतनाथ भगवान
- श्री धर्मनाथ भगवान
- श्री शांतिनाथ भगवान
- श्री कुन्थुनाथ भगवान
- श्री अरहनाथ भगवान
- श्री मल्लीनाथ भगवान
- श्री मुनिसुव्रतनाथ भगवान
- श्री नमीनाथ भगवान
- श्री नेमीनाथ भगवान
- श्री पार्श्वनाथ भगवान -