RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना
- RBI स्थापना भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली,
- ज्याला हिल्टन-यंग कमिशन म्हणूनही ओळखले जाते.
- १९२६ मध्ये हिल्टन बंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ' दि रॉयल कमिशन इंडियन करन्सी आणि फायनान्स' या आयोगाने मध्यवर्ती बँक स्थापन करण्याची शिफारस केली
- या नुसार १ एप्रिल १९३५ रोजी आर. बी. आय. ची स्थापना झाली.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशनच्या शिफारशींच्या आधारे करण्यात आली, ज्याला हिल्टन-यंग कमिशन म्हणूनही ओळखले जाते.
- भारत ब्रह्मदेश हे आर. बी.आय. चे कार्यक्षेत्र होते. मात्र १९४२ पर्यंत आर.बी.आय. ब्रम्टेश चलन नियंत्रित करीत होती.
- RBI . चे राष्ट्रीयीकरण : १ जानेवारी १९४९
- RBI . चे मुख्यालय मुंबई
- RBI चे पहिले गव्हर्नर श्री. ऑसबॉर्न अर्कल स्मिथ
- सर्वाधिक काळासाठी आर.बी.आय. चे गव्हर्नर बेनेगल रामाराव (१९४९ ते १९५७)
- RBI ची विभागीय कार्यालये २२ विभागीय कार्यालये आहेत.
- RBI ची महाराष्ट्रात तीन विभागीय कार्यालये आहेत.
- मुंबई ,बेलापूर (नवी मुंबई) ,
- नागपूर आर.बी.आय. चे जमा-खर्चाचे वर्ष १ जुलै ते ३० जून
- रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे.
- हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते.
- सर ओस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर होते. त्यांनी १ एप्रिल १९३५ रोजी आपला कार्यभार स्वीकारला. ते दि. ३०-जून-१९३७ पर्यंत आपल्या पदावर होते
- सर जेम्स ब्रेड टेलर हे दि. ०१-०७-१९३७ ते दि. १७-०२-१९४३ या काळात गव्हर्नर होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर, ते दि. ११-०८-१९४३ रोजी या पदावर विराजमान झाले. १९५० ते १९५६ या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणून काम पाहिले.
- डॉ. मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषविणारे आतापर्यंत एकमेव गव्हर्नर ठरले
भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
- भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
- भारताची गंगाजळी राखणे.
- भारताची आर्थिक स्थिती राखणे.
- भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.
आर.बी.आय.ची कार्य
१. आर.बी.आय. ही देशाची मध्यवर्ती बँक म्हणून काम करते.
२. आर.बी.आय. बँकांची बँक म्हणूनही काम करते.
३. चलननिर्मिती व पतनियंत्रण हे आर.बी.आय. चे सर्वात महत्त्वाचे काम आहे.