मनरेगा- अकुशल मजुरांना २५३ रुपयांऐवजी आता २७३ रुपये मजुरी मिळणार आहे.
मनरेगाच्या बजेटमध्ये कपात-
यावर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) एकूण 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशभरात मजुरांवरील संकट वाढण्याची शक्यता आहे.
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेतील कामांच वार्षिक आराखडा तयार केला जातो. या आराखड्यातील कामांमधून मजुरांना रोजगार मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांची वैयक्तिक व सार्वजनिक मत्ता निर्मिती केली जाते.
रोजगार हमीच्या कामांमधून वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक हिताच्या योजना राबवल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रामुख्याने गायगोठे बांधणे, शेळ्यांचे गोठे बांधणे, वैयक्तिक शेततळे उभारणे, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड, नालाबांध, भात खाचरे तयार करणे आदी कामे केली जातात. त्याचप्रमाणे सार्वजनिक कामांमध्ये मातीबांध, नालाबंडिंग, संरक्षक भिंत, पेव्हर ब्लॉक, पत्र्याचे शेड उभारणे, सिमेंट बंधारे बांधणे आदी कामे केली जातात.
१०० दिवसांपर्यत रोजगार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची कमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते.
मनरेगा योजना कधी चालू झाली?महाराष्ट्राचा रोहयो कायदा, त्याची यशस्वी अंमलबजावणी, माहितीच्या अधिकाराचा कायदा व सद्यस्थितीच्या अनुषंगाने अभ्यास करुन केंद्रशासनाने संपुर्ण देशासाठी दिनांक 5 सप्टेंबर 2005 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अमलात आणला.
मनरेगा कामाचे अकुशल कुशल प्रमाण किती आहे?
या सर्व कामांमध्ये कुशल म्हणजे यंत्राद्वारे केली जाणारे कामे व अकुशल म्हणजे मजुरांकडून केली जाणारी कामे यांचे प्रमाण ६० :४० ठेवण्याचे बंधनकारक केले आहे.
- मनरेगा योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असते.
- या योजेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवस रोजगार देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत काम न मिळाल्यास त्याला बेरोजगारी भत्ता देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे..
- या योजनेच्या माध्यमातून रोजगार शोधणाऱ्यांना पाच किलोमीटरच्या परिघात काम दिलं जातं आणि त्यासाठी किमान वेतनही दिलं जातं.
NAREGA Official website CLICK HERE


 
