Ads Area

विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे यांचा परिचय

पोलिस भरती, MPSC, ZP, UPSC, नगरपरिषद, Banking, SSC, ई. सरळसेवा परीक्षा साठी उपयुक्त

विठ्ठल रामजी शिंदेयांचा जन्म एप्रिल २३, इ.स. १८७३ रोजी वर्तमान कर्नाटक राज्यातील जमखिंडी संस्थानातील मराठा कुटूंबात झाला. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचे वडील रामजी व आई यमुना हे कानडी भाषिक असून ते वारकरी पंथाचे होते. साधारणपणे आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता

समाजसुधारक, धर्मसुधारक , लेखक

विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात. 

डीप्रेस्ड क्लास मिशन संस्थेची स्थापना

१९०५ मध्ये प्रार्थना समाजाच्या अहमदनगर येथील एका कार्यक्रमावेळी भिंगार नावाच्या छोट्या खेड्यातून भेटायला आलेल्या अस्पृश्यांनी आपली कर्मकहाणी त्यांना निवेदन केली. हे ऐकून त्यांच्या उद्धारासाठी एक मिशन सथापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यातूनच १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी 'डीप्रेस्ड क्लास मिशन' संस्थेची स्थापना केली. त्याचे पहिले अध्यक्ष न्या. चंदावरकर बनले. १९२२ साली या संस्थेची 'अहल्याश्रम' ही इमारत पुणे येथे बांधण्यात आली

 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे शिक्षण

विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

१९३५ सालच्या बडोदा मराठी साहित्य संमेलनात ते तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष होते.


 

जन्मस्थळ: जमखंडी रुरल
जन्मतारीख: २३ एप्रिल, १८७३
मृत्यूची तारीख: २ जानेवारी, १९४४
शिक्षण: ऑक्सफर्ड विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्याल
  • ग्रंथसंपदा:
  1. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३
  2. Untouchable of India
  3. History of Parihars
  4. माझ्या आठवणी व अनुभव (Autobiography)
  5. भागवत धर्माचा विकास (लेख)
  6. मराठ्यांची पूर्वपीठिका (लेख)
  7. कानडी - मराठी संबंध (लेख)
  8. कोकणी - मराठी संबंध (लेख)
  9. Thiestic directory

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Bottom Post Ad

Ads Area